वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण सुरूच
नागपूर (Maharashtra power) : भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण, आणि महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे १२ऑगष्टपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २४ ऑगस्ट पासून सुकेश गुर्वे व विकी जावळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला.
वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाणा सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी यासाठी १७ ऑगस्ट रोजी, साखळी उपोषण राज्यभर सुरू केले आहे. नागपूरात सर्कल ऑफिस येथे अध्यक्ष समिर हांडे व सचिव अभिजित माहूलकर योगेश सायवानकर उपाध्यक्ष, सागर साबळे यांच्या नेतृत्वातील साखळी उपोषण सुरू आहे. २० ऑगस्ट रोजी, राज्यातील प्रत्येक मंत्राच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन तर २४ ऑगस्ट ला नागपुूरात रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरी पायी मोर्चा काढून आंदोलन करणार्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.
राज्याचे उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य मार्ग काढून त्यांच्या खात्यातील कामगारांना न्याय द्यावा. अशी विनंती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली. महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपनीचे कंत्राटदार व कामगारांनी एकत्रीत येवून सर्वांची ताकत आपल्याला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी दाखवायची आहे, असे प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले.