हिंगोली (India Communist Party) : शेतकर्यांना सर्वकष पिक विमा योजना लागु करुन १ रुपयात पिकविमा दया, शेतकरी व देशविरोधी स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा, शेती व शेतकरी उध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्स्कवादी) यांच्या वतीने बुधवार दि.९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, शेतकर्यांचे तात्काळ कर्ज माफ करावे, शेतकरी व देश विरोधी स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करावा, वनदावे तात्काळ निकाली काढुन वनजमीनी कसणार्यांच्या नावे कराव्यात, गायरान जमीनी तेथे राहणार्यांच्या नावे कराव्यात, शेतकर्यांसाठी सर्वकष पिकविमा योजना लागु करुन १ रुपयामध्ये पीकविमा दयावा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, शेतकरी पेन्शनचा केंद्रीय कायदा करुन १० हजार रुपये पेन्शन द्यावी, संगायो-इंगायो-श्रावणबाळ, विधवा व परितक्त्या यांना दरमहा २१०० रुपये मानधन देण्यात यावे, बांधकाम कामगारांना न.प.व ग्रा.पं.मार्फत अधिकृत प्रमाणपत्र दयावे, महाडिबीटीच्या नावाखाली निराधार योजनेच्या सहा महिन्यापासुन थकलेले सर्व मानधन विनाविलंब देण्याची सोय करावी, मागील महिन्यात आवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अनुदान दयावे, मौजे लोहरा (वाणी) हिंगोली येथे २०२४ मध्ये लघुसिंचन तलाव फुटल्याने १०० हेक्टर शेती पुर्णपणे नष्ट झालेली आहे. त्याची तुटपुंजी मदत देण्यात आली असुन नुकसानीच्या मुल्यांकनानुसान नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्याची सोडविण्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हासचिव कॉ.चंपतराव नाईक, कॉ.आर.आर.कोर्डे, भाई भारत जाधव, अंकुश बुधवंत, सुरेश काचगुंडे, रमेश देवरे, अमोल देशमुख, अझरअली जामकर, बाबुराव गाडे, कुंडलिक साबळे, हाफिजखॉ पठाण, बळीराम खंदारे, किशनराव काशिदे, पिराजी पोटे, बाबुराव बलखंडे, शिवाजी पतंगे, रामा जोंधळे, महादु हुमने, पद्माकर लांडगे, खंडेराव मस्के, दत्तराव सोनुने आदीच्या स्वाक्षर्या आहेत.




