चंद्रपूर (Chandrapur):- लाकुड, बांबु, तेंदुपत्ता मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर माल पोहोचविण्याचे काम करणाऱ्या तक्रारदार व्यापाऱ्याकडून पैशासाठी अडवणूक होत असल्याची तक्रार दिल्यानंतर तीच तक्रार परत घेण्यासाठी ५० हजाराची लाच मागणाऱ्या बल्लारपुर येथील पोलिस उपनिरीक्षक यांना लाच (bribe) स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याची कारवाई दि. १३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास करण्यात आली. लोकसेवक हुसेन शहा असे आरोपीचे नाव असून ते बल्लारपूर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
तक्रार परत घेण्यासाठी ५० हजाराची लाच
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे लाकुड, बांबू, तेंदुपत्ता इत्यादी मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रकने माल पोहचविण्याचे काम करतात. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान तक्रारदार यांनी १९, लाख २ हजार रूपयाचा तेंदुपत्त्याचा माल गडचिरोली (Gadchiroli) जिल्हयातुन चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोहचविलेला होता. त्या मालाचे त्यांचे एकुण १९ लाख २ हजार रू. हे व्यापाऱ्यांकडुन येणे बाकी होते. तीन-चार महिन्यांपासुन सदरचे व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन बल्लारशाह (Ballarpur)येथे लेखी तक्रार दाखल केली. तेव्हा सदर १९ लाख २ हजार रूपयाची रक्कम व्यापाऱ्यांकडुन वसुल करून देणेकामी एकुण रक्कमेच्या वीस टक्के रक्कम अंदाजे ३ लाख ८० हजार रूपयाची मागणी आरोपीने केलेली होती.
मानसिक त्रासाला वैतागुन नोंदविली तक्रार
तक्रारदार (Complainant) यांच्या सदर व्यवहारात नंतर तडजोड होवुन त्यांना फक्त गुंतवलेली मुद्दल १६ लाख १५ हजार व्यापाऱ्यांकडुन प्राप्त झाली. सदर व्यापारी व तक्रारदार यांच्यामध्ये समझोता होवुन सदर प्रकरण त्यांनी आपसात मिटवले. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला व्यापाऱ्यांविरूध्द दिलेला लेखीतक्रार अर्ज मागे घेत असल्याबाबत आरोपी लोकसेवक हुसेन शहा यांना सांगीतले असता आरोपींनी दिलेला तकारअर्ज मागे घेण्याकरीता तक्रारदारास वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होते. तसेच वरिष्ठांकडुन खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवित असल्यामुळे तक्राररदार यांनी होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागुन ८ जानेवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे येवुन दि. तक्रार नोंदविली.
प्राप्त तक्रारीवरून वेळोवेळी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपा शहा यांनी तक्रारदार यांचेसोबत तडजोड करून ५० हजार घेण्याचे मान्य केले होते. या प्रकरणात आरोपी पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याना अटक करण्यात आली.