गत पाच वर्षातील अकार्यक्षमता या निवडणुकीत भोवणार!
पुसद (Pusad Assembly Election) : पुसद तालुक्याचे कधीकाळी राज्याच्या राजकारणात अनन्य साधारण महत्व होते. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक गुन्हेगारीचे कर्दनकाळ ठरलेले मुंबईतील गुन्हेगारी नष्ट करणारे जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूमिपुत्र कै. सुधाकरराव नाईक यांच्या पारदर्शक व कार्य कुशलतेने पुसद चे नाव लौकिक होते. मात्र त्यानंतर आलेल्या माजी मंत्री मनोहर नाईक यांनी ज्या पद्धतीने पुसद तालुक्याचा विकास करायला हवा होता. तो त्यांच्या कार्यकाळात झाला नाही.
तर पूर्वजांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व शेतकरी कारखानदार झाला पाहिजे हे स्वप्न कोणाशी बाळगणारे कै. वसंतराव नाईक यांनी पोफळी येथे एक सहकारी साखर कारखाना निर्माण केला, तर सुधाकरराव नाईक यांनी गुंज एक सहकारी साखर कारखाना निर्माण केला. कै. शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था यांच्या माध्यमातून जीन क्रमांक एक व दोन , अप्पाजी आसेगावकर यांच्या माध्यमातून कारला रोडवर सुध्दिनी सुरू झाली. त्या माध्यमातून अनेकांना अनेक रोजगार प्राप्त झाले. हळूहळू एक एक सहकारी संस्था नाईक परिवाराच्या आशीर्वादाने नामशेष होत गेल्या. कर्मचारी शिक्षक भिकेला लागले.
एवढेच नव्हे तर जिनिंग प्रेसिंग च्या जागाही विकल्या गेल्या एवढ्यावरच थांबले नाही तर तांड्या वाड्यांचा विकासही झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील 60% कुटुंब हे आपल्या परिवारासह तर निर्वाहासाठी ऊस तोडी करिता, नारायणगावला मजूर म्हणून, तरुण औरंगाबाद मुंबई पुण्याच्या कंपन्यांमध्ये रोजगारांसाठी भटकत असतात. तालुक्याला दोन दोन मुख्यमंत्री सतत मंत्रिपद मिळूनही तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. गेल्या पाच वर्षापासून महायुतीच्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चे आमदार इंद्रनील नाईक हे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये मात्र विकास तर अजून हरपला. रस्त्यांची दुरवस्था झाली.
सर्वत्र खड्डेमय रस्ते शहरात. औद्योगिक वसाहती मध्ये कुठलाही एक युनिट आणू शकले नाही. करोडो रुपयांची कामे आणली असे म्हणतात. ती गेली कुठे! विकासाच्या कामांची गुणवत्ता नाही, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामांमध्ये अति ढवळाढवळ, त्याने आपल्याच तीन-चार मित्रांना मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा एक न अनेक अकार्यक्षमतेच्या कारणांमुळे व पुसद जिल्हा व्हावा यासाठी कुठलाही प्रयत्न न करणे यामुळे मतदारांपासून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक हे दुरावल्या गेले आहेत.
दुसऱ्यांदा महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांना मतदार संधी देण्याच्या मूडमध्ये नाहीत. दुसरीकडे नव्या दमाचे सत्तेत नसूनही राजकारण विरहित समाजसेवा करणारे जनतेच्या दुःखात सहभागी होणारे पहिल्यांदाच जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीच्या घटक पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद यांना मात्र मतदार पसंती देताना दिसत आहेत. तर तिसरे उमेदवार म्हणून आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी माधवराव वैद्य हे पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरले आहेत. जनतेचा त्यांनाही प्रचंड पाठिंबा मिळत आहे काही असो यंदा होणारी पुसद विधानसभा निवडणूक ही मात्र ऐतिहासिक ठरेल, व लोकसभेच्या निवडणुकीसारखीच ही पण निवडणूक मतदारांनीच हाती घेतलेली असल्यामुळे निकाल हा परिवर्तनाचा राहणारच यात तिळमात्र शंका नाही.