परभणी(Parbhani) :- प्रलंबीत असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार ८ जुलै रोजी परभणी शहर महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना (shivsena)विभाग प्रमुख अशोक गव्हाणे, अविनाश आवचार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मागण्या एका महिन्यात मान्य नाही तर मुक्काम आंदोलन करण्यात येणार
नोटरी मालमत्ता फेर लावण्याची प्रक्रिया चालू करावी, रमाई घरकुल योजनेचा (Ramai Gharkul Yojana) लाभ द्यावा, रस्ते बनवावेत, शहरातील धुळीवर उपाय योजना कराव्यात, प्रभाग क्रमांक १६ व १२ मधील डिपी प्लॅन(DP Plan) रद्द करण्यात यावा, नोटरी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana) लाभ द्यावा, पिंगळगड नाल्यावरील अतिक्रमण काढावे आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर संजय सारणीकर, अंबिका डहाळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.