अर्जुनी/मोरगाव (Badlapur protest) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून तहसील कार्यालय वर मोर्चा काढला. या (Badlapur protest) मोर्चात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार चा निषेध आणि घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने केली.
मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करताना सांगितले की, “महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत राज्यातील महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (Badlapur protest) बदलापुर येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असुन आरोपींवरती कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची देखील चौकशी करुन पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मोर्चानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पदाधिकाऱ्यांनी अर्जुनी/मोरगाव तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे निवेदन देण्यात आले आणि निवेदनात नमुद बदलापूर येथील (Badlapur protest) घटनेचा तीव्र निषेध नोंदवुन आरोपींवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी अर्जुनी/मोरगाव तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम धामट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख चेतन दहिकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश खोब्रागडे, शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णा शाहरे, कार्याध्यक्ष प्रमोद पाउलझगडे, डॉ. भारत लाडे, संजय पवार यांचेसह अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.