– संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याकरिता राज्यभर आंदोलन
पुसद (Amit Shah) : भारतातील सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना१९४९ रोजी संविधान अर्पण करून समता,बंधुत्व, स्वतंत्र व धार्मिक, अधिकार घटनेचे शिल्पकार, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केले आणि त्या संविधानाच्या आधारे लोकशाहीमुळे आज भारत देशाचे गृहमंत्री असलेले नुकतेच भारताच्या सर्वोच्च सभागृह संसद भवन येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुरोगामी फुले, शाहू,आंबेडकर विचारधालेला मानणाऱ्या बहुजन समाजाच्या भावना दुखविल्या आहे.
याचा निषेध करून गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्या यावे तसेच बीड जिल्ह्यातील तालुका केज मौजा मस्साजोग येथील कर्तव्यदक्ष सरपंच संतोष देशमुख यांची सूडबुद्धीने निघृण हत्या करण्यात आली त्यांच्या आरोपीला अद्याप पर्यंत अटक झाली नसल्यामुळे त्या आरोपीला तात्काळ अटक करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे व संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने 50 लाखाची मदत करून सहकार्य करावे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती पुसद, तथा भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे, पुसद,भीमशक्ती सामाजिक संघटना पुसद, एमआयएम राजकीय पक्ष पुसद, व भीम आर्मी सामाजिक संघटना पुसद, यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुसद यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे.
या विषयाची तात्काळ दखल घेऊन अमित शहा (Amit Shah) यांनी माफी मागून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी व कर्तव्यदक्ष सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा अशा विषयाचे निवेदन देण्यात आले आहे यानिवेदनावर,विठ्ठल खडसे, सुधीर देशमुख, लक्ष्मण कांबळे, बाबाराव उबाळे, बाळासाहेब वाठोरे,ज्ञानदेव बांडे, दिनेश सावळे, संतोष आंभोरे,अशोक भालेराव,बाबुराव पाईकराव,गजानन इंगोले, मोहम्मद अजीम, गणपत हटकर,भास्कर बनसोड, प्रकाश धुळे, राजेंद्र नाईक, सतीश इंगोले, दिनेश खांडेकर,विशाल पडघणे, विजय बाबर,अंबादास वानखेडे, नितेश खंदारे इत्यादी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला व सहभागी झाल्या होत्या.