पुणे (Pune Accident) : पुण्यातील पोर्श कार अपघात (Pune Accident) प्रकरणात एक-एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. राज्यात एका वेगवान कारचा व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये कारस्वाराने दोघांना चिरडले होते. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. कारचा वेग एवढा होता की, कारस्वाराला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. ही घटना पुण्यातील कल्याणीनगर येथील असून, तेथे एका पोर्श कारने दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. (Pune Police) पुणे शहर पोलिसांचे डीसीपी विजय कुमार यांनी सांगितले की, आरोपी कारस्वाराला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असून, पुणे पोलिसांकडून मोठे खुलासे करण्यात आली आहे.
मी दारु पितो, पप्पांनीच मला गाडी दिली’ आरोपी मुलाची कबुली
या घटनेनंतर नुकसान झालेली गाडी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात उभी करण्यात आली आहे. 19 मे रोजी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पोर्श कारने दुचाकीला मागून धडक दिली. पोलिसांनी बार मालक आणि बारच्या व्यवस्थापकालाही अटक केली आहे. हा अल्पवयीन तरुण आपल्या मित्रांसोबत (12th Result) बारावीचा निकाल साजरा करण्यासाठी गेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अल्पवयीन तरुण बारमध्ये दारू पिताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कायद्यानुसार 25 वर्षांखालील मुले-मुली कोणत्याही रेस्टॉरंट किंवा बारमध्ये दारू पिऊ शकत नाहीत. त्यांना दारू दिली जाऊ शकत नाही. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या (Pune Accident) घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात कारचा वेग खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे.
या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला
या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला
या (Pune Accident) अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही राजस्थानचे रहिवासी आहेत. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा पहाटे अडीचच्या सुमारास घडला. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण करून (Pune Police) पोलिसांच्या स्वाधीन केले. माहितीनुसार, कार चालविणारा हा अल्पवयीन असून तो दारूच्या नशेत कार चालवत होता. आरोपी मित्रांसोबत पार्टी करून परतत होता. घटनेच्या 15 तासांनंतर कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
पुण्यातील घटना अतिशय गंभीर, कुणालाही सोडणार नाही: Devendra Fadnavis
पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची दखल घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहचून, या घटनेचा आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यातील घटनेचा सीसीटीव्ही पाहिल्यावर साधारण अग्रवालची पोर्शे किती वेगाने चालली होती ते कळेल. #pune pic.twitter.com/cYRVQBMjaG
— Omkar Wable (@omkarasks) May 20, 2024
पुणे पोलीस सोशल मीडियावर ट्रोल
पुणे पोलिसांच्या एकूणच कारवाईवर सोशल मीडियावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश पण ट्रोल झाला आहे. कार अपघातात एखाद्याचा बळी घेतला आणि निबंध लिहिला तर शिक्षा पूर्ण होते का? असा सवाल सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. X वर काहींनी केवळ निंबध लिहिला तर, वाहन परवाना मिळतो का? असा उपरोधिक टोला आहे. या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडली आहे.