लोणावळ्यात अचानक आलेल्या पुरात संपूर्ण कुटुंब वाहून गेले
पुणे (Pune Bhushi dam Video) : महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत लोक पावसाळी ठिकाणी पिकनिकसाठी जमत आहेत. अशाच एका पिकनिक स्पॉटवर एक मोठी दुर्घटना घडली, ज्याचा एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ लोणावळा हिल स्टेशनजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांसह पाच जण वाहून गेले. सहलीसाठी आलेले कुटुंब लोणावळ्यातील डोंगराळ भागात एका धबधब्याजवळ पावसाचा आनंद लुटत असतांनाच एका मोठ्या अपघाताला बळी पडले. त्या धबधब्यात अचानक आलेल्या पुरात महिला आणि 4 मुले वाहून गेली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांचा शोध सुरू आहे.
महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले
आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या भीषण अपघातात एक 36 वर्षीय महिला आणि 13 वर्षे व 8 वर्षे वयाच्या दोन मुलींचा अचानक जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्या धरणाजवळील नदीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन मुलांचा शोध सुरू आहे.
एकाच कुटुंबातील पाच लोक भुशी डॅम येथे बुडाली
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील लियाकत अन्सारी आणि युनूस खान हे त्यांच्या कुटुंबातील 17-18 सदस्यांसह लोणावळ्याला आले होते. भुशी धरणाच्या मागे धबधबा असून, त्यावेळी अचानक जोरदार आलेल्या प्रवाहात 5 जण अडकले. अनेकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्या प्रवाहात वाहून गेल्याने एक महिला आणि चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पाचही जण पुण्यातील सय्यद नगर येथील एकाच कुटुंबातील आहेत.
#UPDATE | Pune: One more body recovered and the rescue operations have been halted for today. The search and rescue will resume tomorrow morning: Pune Rural Police
(Video Source: Pune Rural Police) https://t.co/FiGBK4uVhN pic.twitter.com/5JzC6335XL
— ANI (@ANI) June 30, 2024