पुणे (Pune car Accident) : पुण्यातील कार अपघातात (Pune car Accident) एकापाठोपाठ एक मोठी माहिती समोर आली आहे. पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक अग्रवाल कुटुंब याप्रकरणी चर्चेत आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांनी आपल्या भावासोबत संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्ड (Don Chhota Rajan) डॉन छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप आहे. त्यादरम्यान राजनच्या टोळ्यांनी गोळीबार सुद्धा केला होता. त्यानंतर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
येथे CLICK करा : ‘मृत्यूचा तांडव’; भरधाव कारने दोघांना चिरडले; पुन्हा मोठा खुलासा
नशेत असताना झाला अपघात
सुरुवातीला या (Pune hit and run case) प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कारसह दुचाकीस्वारावर धडक दिली होती.
या अपघातात दोन अभियंते ठार
या (Pune car Accident) अपघातात दुचाकीवरील दोन अभियंते ठार झाले. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या (Pune car Accident) प्रकरणात बाल मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मोठा खुलासा
पुणे पोलिसांनी (Pune Police) तीन आरोपींना ताब्यात घेतले. तरुणांनी पार्टी केलेल्या बारचा मालक आणि दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. या लोकांवर अल्पवयीन व्यक्तीला अल्कोहोल दिल्याचा आरोप आहे. त्यांना 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. कोजी रेस्टॉरंटचा मालक नमन प्रल्हाद, व्यवस्थापक सचिन काटकर आणि ब्लॅक क्लब हॉटेलचे व्यवस्थापक संदीप सांगळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची या प्रकरणात दखल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अपघातानंतर सांगितले की, पोलिसांनी तात्काळ आयपीसीच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि जेजेबीसमोर रिमांड अर्ज दाखल केला. आरोपी 17 वर्ष 8 महिन्यांचा आहे, त्यामुळे त्याला प्रौढांप्रमाणे वागणूक द्यावी. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाने केलेल्या जघन्य गुन्ह्याबाबतचे नियम बदलण्यात आले. 16 वर्षाच्या तरुणाला प्रौढांसारखे वागवले जाणार आहे. त्याआधारे (Pune Police) पुणे पोलिसांनी आरोपींना प्रौढांप्रमाणे वागणूक देण्याचे आवाहन, बाल मंडळाला केले आहे.
#WATCH | Pune car accident case | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "This is a very cheap attempt to politicise this incident because, in the Pune incident, the police took immediate action. We have also expressed surprise at the decision given by the Juvenile Justice… pic.twitter.com/W5khTPpCI4
— ANI (@ANI) May 22, 2024