नागपूर (Punekar murder case) : सदर येथील राहत्या घरी मुक्त छायाचित्रकार विनय पुणेकर (Punekar murder case) यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला आरोपी हेमंत शुक्ला याने उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका तरुणावर सुपारी घेऊन गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला होता. सदर पोलिसांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. दीड वर्षांअगोदर ही घटना झाली होती. हेमंतने २३ फेब्रुवारी रोजी विनय पुणेकर (Punekar murder case) यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
२७ जून रोजी पंजाबमधील लुधियाना येथे जाऊन सदर पोलिसांनी त्याला पकडले. पोलिस कोठडी संपल्यापासून तो कारागृहात आहे. फेब्रुवारी २०२३ रोजी बलियाच्या भीमपूरमध्ये जुन्या वादातून हेमंत शुक्ला रणवीर अर्जुन यादव नावाच्या तरुणावर त्याने गोळ्या झाडल्या होत्या. हेमंतने सुपारी घेऊन हे कृत्य केले होते. बलिया पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली होती. परंतु त्यांच्याकडे हेमंतबद्दल सविस्तर माहिती नव्हती. रायपूर येथील ‘शुक्ला’ नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. (Punekar murder case) बलिया पोलिसांनी रायपूरला जाऊन कथित शुक्लाची चौकशी केली.
सदर पोलिसांनी हेमंतचा तपशील उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश पोलिस आणि एनसीआरबीला पाठवला होता. त्याआधारे बलिया पोलिसांनी सदरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. ठाकरे यांनी हेमंतचा फोटो आणि बोटांच्या ठशांचे नमुने बलिया पोलिसांना पाठवले. (Punekar murder case) गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हेमंतला ओळखले. प्रॉडक्शन वॉरंट घेऊन बलिया पोलिस हेमंतला अटक करणार आहेत.