कोरेगाव, चोप (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, चोप , बोळधा, रावनवाडी, टोली या गावाचा तालुक्याची संपर्क तुटला नदी नाले भरून वाहत असल्याने शेती कामे बंद पडलेली आहेत. घरांची पडझड झाली जनजीवन विस्कळीत झाले, 19 जूलै च्या रात्रीपासून तालुक्यात जोरदार पावसाने (rain)हजेरी लावली, तेव्हापासून पाऊस पडत होता.
नदी नाले असून पावसाने तुडुंब भरून वाहत असल्याने 19 तारखेपासून तालुक्यासी संपर्क तुटला
परंतु 20 तारखेला काही काळ उसंत दिल्याने मार्ग खुले झाले होते, परंतु 21 तारखेच्या सायंकाळी चार वाजता पासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. पाचही गावांना नदी नाले असून पावसाने तुडुंब भरून वाहत असल्याने 19 तारखेपासून तालुक्यासी संपर्क तुटलेला आहे. शेतातील बांधावर पाणी साचल्याने शेतीचे कामे ठप्प पडलेले आहेत, तर मुसळधार पावसाने चोपा येथील मदन बनपुरकर यांचे घर पडले, तर कोरेगाव येथील लाकडू सहारे यांचे घर पडले व बोळधा, शंकरपूर, कसारी, रावनवाडी, येथील घरांची किरकोळ पडझड झालेली आहे. ब्रह्मपुरी, किशोरी बस केशोरीला जाऊ न शकल्याने देसाईगंजला परत जात असतांना चोप येतथील नाल्यावर पाणी चढल्याने एसटी महामंडळाची बस (bus)चोपच्या बस स्थानकावर थांबून आहे.
सध्या स्थितीत संपूर्ण परिसर जलमय झालेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे
कोरेगाव चोप शंकरपूत रस्ता बंद पडलाय तर कोरेगाव एकलपुर रस्ता नदीच्या पुलावर(river bridge) पाणी चढल्याने हाही रस्ता बाधित झालेला आहे, गोंदिया (Gondia)जिल्ह्यातील केशोरी, वडेगाव, बंध्या येथिल नजीकच्या पुलावर पाणी चढल्याने केशोरी , वडेगाव मार्ग बंद पडला आहे. कोरेगाव, कसारी नाल्यावरपूर वाढल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे. सध्या स्थितीत संपूर्ण परिसर जलमय झालेला असून जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, सुदैवाची एक बाब आहे की कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, पावसाने उसंत न दिल्यास सर्वच मार्ग बंदच राहणार राहण्याची संकेत दिसत आहेत.