मानोरा(Washim):- तालुक्यात नाफेड कडून चालू असलेली सोयाबीनची (soybeans) खरेदी चार दिवसापासून बारदाना नसल्याने बंद पडली आहे. खासगी खरेदीदार व व्यापाऱ्यांनी बेभावपणे सोयाबीनची खरेदी चालू केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
बेभावपणे सोयाबीनची खरेदी चालू केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची होत आहे पिळवणूक
राज्य शासनाने (State Govt) शेतकऱ्यांच्या हिताकरिता नाफेड व एन सी एफ अंतर्गत प्रती क्विंटल ४ हजार ८९२ रूपये दराने सोयाबीन खरेदी सुरू केली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय पोर्टलवर सोयाबीन विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी केले होते. तालुका ठिकाणी मानोरा व भोयणी येथे नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू आहे. परंतु गत तीन ते चार दिवसापासून खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद पडली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या मालाचा हमी भाव ठरला असतानाही खरेदीदार किंवा व्यापारी त्या भावाने शेतमाल खरेदी केली जात नसल्याने ते एकप्रकारे शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. याची जाणीव सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळीना असुनही ते जाणीवपूर्वक कोणतीच भूमिका घेत नसल्याने नेते मंडळीचा दुटप्पीपणा दिसून येत आहे.