Gold rate:- व्याजदर कपातीला झालेला विलंब, अमेरिकेत (America)अपेक्षेपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्यामुळे आणि चीनमध्ये सोन्याची घटलेली मागणी यामुळे गेल्या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 6% पेक्षा जास्त म्हणजेच 3300 रुपयांनी घसरण झाली आहे आणि तज्ञांचे म्हणणे आहे की जर चीनच्या सेंट्रल बँकेने (Central Bank) जूनमध्येही सोने खरेदी केले नाही तर त्याच्या किमती आणखी खाली येऊ शकतात.
24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 2200 रुपयांहून अधिक घट
गेल्या तीन दिवसांत MCX आणि देशांतर्गत सराफा बाजारात(Bullion market) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 2200 रुपयांहून अधिक घट झाली आहे. स्पॉट गोल्डने 22 मे रोजी जागतिक बाजारात $2,449.89 प्रति औंसची विक्रमी पातळी गाठली होती, जी आता $2300 च्या खाली आहे. त्याचप्रमाणे, MCX वर किंमत 74,442 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होती, जी आता 71,000 रुपयांच्या खाली आहे. तथापि, मे महिन्यात जागतिक स्तरावर प्रथमच गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढली. AMFI च्या मते, मे महिन्यात भारतातील गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक देखील 4 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. मे महिन्यात देशातील एकूण 17 गोल्ड ईटीएफमध्ये 827.43 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे.
मे महिन्यात चीनच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही
सेंट्रल बँक ऑफ चायना ने सोन्याच्या खरेदीला लावलेल्या ब्रेकचा परिणाम भावांवर दिसून येत आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाच्या(People’s Bank of China) आकडेवारीनुसार, या वर्षी मे महिन्यात चीनच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही. याआधी चीनच्या सोन्याच्या साठ्यात सलग १८ महिने वाढ झाली होती. चीनचा सोन्याचा साठा एप्रिलमध्ये 2 टनांनी वाढून 2,264 टन झाला. तथापि, चीनच्या सोन्याच्या साठ्यातील ही 18 महिन्यांतील सर्वात कमी वाढ होती. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत, हे अंदाजे 319 टन म्हणजेच 16.5% अधिक आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने 2023 मध्ये सोन्याचा साठा 225 टनांनी वाढवला, ज्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या.