परभणी/पूर्णा (Purna Accident) : परभणीतील पूर्णा तालूक्यातील झिरोफाटा येथील औंढा रोड टि पॉईंट कॉर्नरवर १६ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी आयशर व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक (Purna Accident) होवून धडकेत मोटारसायकल वरील चारजण गंभीर जखमी झाले. जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
पूर्णा तालूक्यातील झिरोफाटा स्थित औंढा रोड टि पॉईंट कॉर्नर येथे परभणीकडून आयशर क्रमांक एम एच २६ बीई,९६९४ हा भरधाव वेगात वसमतकडे जात असताना समोरुन परभणीच्या दिशेने दोन मोटारसायकल येत असताना या पैकी कौडगाव येथील एक मोटारसायकल क्र.एम.एच.२२ ए एल ४००७ ला चुकवताना दुसरी मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३८ के ३६५९ हीस आयशरची (Purna Accident) जोरदार धडक बसली
या भिषण अपघातात दारेफळ ता. वसमत जि. हिंगोली येथील शिवाजी गोविंदराव खरबडे (वय ३६),गिता शिवाजी खरबडे (वय ३२) सानवी शिवाजी खरबडे (वय ९),अनूष्का शिवाजी खरबडे या एकाच कुटूंबातील सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी गिता खरबडे यांची प्रकृत्ती चिंताजनक सांगीतले जात आहे. दरम्यान, (Purna Accident) अपघाताची माहीती मिळताच तात्काळ परभणीतील पूर्णा पोलिस ठाण्याचे पो.उ.नि. श्रिनिवास पडलवार, पो. हे. श्याम काळे, पो. हे. मंगेश जुक्टे, आदींनी पाहणी करून पुढील तपास चालू केला आहे