पूर्णा (Purna railway) : येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तुंबलेला नाला साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाने खोदुन ठेवलेला खड्डा जीवघेणा ठरतो आहे. येथून ये-जा करणा-यांना पंधरा दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, (Municipal administration) प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
पूर्णेतील प्रकार; प्रशासनाचे दुर्लक्ष
पूर्णा रेल्वे स्थानक (Purna railway) परिसरातील मुख्य रस्त्यावर रेल्वेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोरुन एक मोठा नाला जातो. मागील काही वर्षांत या नाल्यांची सफाई न झाल्याने नाला केरकचरा अडकून तुंबला होता. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पालीका प्रशासनाने हा नाला जेसीबी लावून खोदला यातील भुमीगत टाकलेल्या नळ्या बाहेर काढून टाकल्या. यानंतर (Municipal administration) पालिकेने नळ्यांची साफसफाई करून या नळ्या परत बसवून नाली बुजवणे अपेक्षित होते. परंतू तसे न केल्यामुळे हा खड्डा जैसे थे परिस्थिती तसाच ठेवण्यात आला. येथून ये-जा करणा-या रेल्वे प्रवाशी व शहरातील नागरीकां साठी मोठा अडचणींचा ठरत आहे.
पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त
रेल्वे प्रवेशद्वारासमोर (Purna railway) वाढलेले अतिक्रमण रस्त्यावर बेशिस्त वाहतूक लाऊन रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच ऐन रस्त्यातच खड्डा असल्याने येथुन दुचाकी चारचाकी वाहन ने -आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता साफसफाईसाठी खड्डा खोदून ठेवला आहे. साफसफाई झाल्यावर हा खड्डा बुजवला जाईल, असे थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याचे दिसत आहे. मागील पंधरा दिवसांपासून खोदून ठेवलेल्या खड्डयाचा त्रास असल्याने (Municipal administration) पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी याबाबत आंदोलन करण्याचाही ईशारा दिला आहे.
रेल्वे प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणमुळे वाहतूक कोंडी
पूर्णा रेल्वे स्थानकात (Purna railway) जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर दोन प्रवेशद्वारे आहेत. या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर दुतर्फा टपरीधारक,हाॅटैल व्यवसायिकांनी अतीक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. दुकानासमोर ऐन रस्त्यावर मोठी वर्दळ असते येथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने या दुकानासमोर सुटत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. याकडे पालिका व (Purna Police) पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.