परभणीच्या फुलकळस येथील प्रकार
परभणी (Jaljeevan Mission) : पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जलजीवन कामाच्या तक्रारीवरून अधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर घेतलेल्या बैठकीत शाब्दीक बाचाबाची होऊन बैठकीचे रुपांतर किरकोळ वादात झाले. या विषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे (Jaljeevan Mission) जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी जलकुंभ, पाईपलाईन टाकणे आणि पाणी पुरवठा विहीर मंजुर झाली आहे.
जलजीवन अधिकार्यांनी केली कामाची पाहणी
या कामाची नागरीक संतोष कांबळे यांनी जलजीवनकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची दखल घेत जलजीवन मिशनच्या अधिकार्यांनी संबंधीत कामाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केलेल्या कामावरून व तक्रार देण्यावरून शाब्दीक बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसन वादात झाले. त्यामुळे बैठक मोडली. दरम्यान (Jaljeevan Mission) जलजीवनचे अधिकारी कुठलीही कार्यवाही न करताच निघून गेले. या विषयी अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नाही.
जलजीवन कामाचे दिले कंत्राट
जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत फुलकळस येथे पाणी पुरवठ्यासाठी गावात जलकुंभ आणि पाईपलाईन टाकणे आणि तसेच धानोरा काळे परिसरात गोदावरी नदीवर पाणी पुरवठा विहीर खोदणे आदी कामाचे कंत्राट देण्यात आले होते. ग्रामस्थांनी सदर कामाविषयी जलजीवनकडे तक्रार केली होती. तीची दखल घेऊन जलजीवन अधिकार्यांनी जलकुंभ, पाईपलाईन आणि पाणी पुरवठा विहीरीची पाहणी केली. दरम्यान या विषयी आयोजित बैठकीत नागरीकांत आपसात वाद उफाळून आला.