पुर्णा(Purna):- शेतातील आखाड्यावर बांधलेल्या चार शेळ्यांचा अज्ञात हिस्त्र प्राण्यांनी हल्ला करून फडशा पाडल्याची घटना शनिवारी (दि.४) रोजी सकाळी८ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील सुहागन शिवारात घडली आहे. घटनेत शेतकऱ्यांचे नुकसान मोठं नुकसान झाले आहे.
परिसरात भितीचे वातावरण
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,पूर्णा तालुक्यातील आव्हई येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद दत्तराव पवार यांची सुहागन शिवारात गट. क्रमांक ४० मध्ये शेती दोन एकर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन (Goat rearing) हा व्यवसाय सुरू केला होता. शुक्रवारी ३ रोजी रात्री शेतात आखाड्यावर नेहमीप्रमाणे शेळ्या बांधून ते झोपण्यासाठी गेले. आणि शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास गावाकडे आले पुन्हा आठच्या सुमारास जेवण करून शेतात परत त्यावेळी त्यांना चारही शेळ्या अज्ञात हिस्त्रं प्राण्याने (animal) फाडून जीवे मारल्याचे लक्षात आले हे दृश्य पाहून शेतकऱ्यांस धक्का बसला. या घटनेमुळे सदरील शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटना घडुन जवळपास सहा ते सात तासांचा कालावधी लोटला परंतु घटनास्थळी प्रशासनाकडून कोणत्याही अधिका-यांनी भेट दिली नसल्याचे समजते. घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण (atmosphere of fear) निर्माण झाले आहे. याप्रकरणी सदरील शेतकरी पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.