स्व. संतोष देशमुख याचां मारेकऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी!
परभणी (Purna) : बीड जिल्ह्य़ातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यानां वाल्मीक कराड व त्याचा साथीदारांनी खंडणीसाठी ज्या प्रकारे निर्घृण हत्या केली. त्या सर्व आरोपींना शासनाने (Government) दिरंगाई न करता तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी आज दि.8मार्च शनिवार रोजी पुर्णेत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज सकाळपासूनच येथील व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात येत असुन, शहरातील सोनार गल्ली ते नादेंड रोड कडील टी पाईंट पर्यन्त सर्व व्यापारी आस्थापने, आडत दुकाने व छोटे व्यावसायिकांकडून दुकाने बंद ठेऊन या मागणीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
आरोपींविरुद्ध खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन त्यानां फाशीची शिक्षा द्या…!
सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवराय यांच्यां अश्वारूढ पुतळ्या जवळ एकत्रीत येऊन विविध सामाजिक संघटना, व्यापारी असोसिएशन ,सकल मराठा समाज,बहुजन समाज याचां वतीने राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंञी यांना येथील पोलीस निरीक्षक याचां मार्फत निवेदनै देण्यात आली. या निवेदनात महाराष्ट्रात विशेषता बीड जिल्हयात संघटीत गुन्हेगार वाढीस लागले असुन, आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) व त्याचा साथीदार वाल्मीक कराड यानी अनेक तरुण हाताशी धरुन गुंडगिरी वाढवली व खंडणी, खुन व दहशत निर्माण केली असुन त्यातुनच मस्साजोग येथील संरपच संतोष देशमुख याचां मारहाण करून निर्घृण पणे खुन करण्यात आला आहे. या खुना मागे वाल्मीक कराड (Valmik Karad) धनंजय मुडें याचा हात आहे, हे स्पष्ट हात दिसुन येतो आहे. त्यामुळे पकडलेल्या सर्व आरोपींविरुद्ध खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन त्यानां फाशीची शिक्षा (Capital Punishment) झाली पाहिजे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.