अक्षय्य तृतीया निमित्त पुसदच्या बाजारपेठेत महिलांची मोठी गर्दी
Pusad: तृतीयाच्या निमित्त पूर्वसंध्येला पुसदच्या बाजारपेठेमध्ये (Marketplace) खरेदी करण्याकरिता महिलांची मोठी गर्दी विविध दुकानांमध्ये दिसत होती. विशेष करून अक्षय तृतीया ला सोनचांदी (Gold- Silver) खरेदी करण्याची प्रथा पारंपारिक आहे. या दिवशी खरेदी केलेली वस्तू. अतिशय महत्त्वपूर्ण असते असा समज विशेष करून महिला वर्गांचा झाल्यामुळे खरेदी करिता मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये सुवर्ण अलंकार दुकानांमध्ये ती करताना दिसत होते.
विविध सवलतीचे आमिष दाखवत दालन सुरू केल्याचेही दिसत
तर अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर शहरात अनेक नवीन व्यावसायिक दुकाने, प्रतिष्ठान, यांच्यासह प्लॉटिंग डेव्हलपर्स लेआउट (Plotting Developers Layout) मालकांनी ग्राहकांना विविध सवलतीचे आमिष दाखवत आपले नवीन व्यवसायाचे दालन सुरू केल्याचेही दिसत आहे. विविध भागांमध्ये शहरातील नवनवीन लेआउट चा शुभारंभ केल्या जात आहे. निश्चितच पुसद (Pusad) ची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने सुरू आहे. मात्र अकार्यक्षम राज्यकर्त्यांमुळे आमदार खासदारांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून पुसद जिल्हा झालेला नाही. सर्व दृष्टीने सक्षम आहे. राज्यकर्त्यांना सच्चा विकास नको. जिल्हा झाला तर नागरिकांना मोठा न्याय मिळेल विकास होईल. व आपली दुकानदारी बंद. या भीतीपोटी पुसदच्या विकासाला अडकाठी आणणाऱ्या या राज्यकर्त्यांना जनतेनेच आता जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे.