पुसद(Pusad):- ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गाजीपुर शेत शिवारात गाजीपुर येथील एका अल्पवयीन सोळा वर्षीय मुलाने बैलाला पाणी पाजून येतो असे घरच्यांना सांगून शेतात जाऊन गाजीपुर शेत शिवारात लिंबाच्या झाडाला काळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची घटना दि.२८ एप्रिलच्या सहा ते दहा वाजता दरम्यान घडली.
गाजीपुर शेत शिवारात एका अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव नारायण बळी रा. गाजीपुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला असून मर्ग नं.०१५/२०२४ कलम १७४ दाखल, फिर्यादीचा नातू मृतक कार्तिक पांडुरंग बळी वय १६ वर्ष रा. गाजीपुर दि.२८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता बैलाला चारा पाणी करण्याकरिता शेतात गेला होता. त्यानंतर मी व माझा मुलगा व माझी सून असे आम्ही सर्व मिळून सकाळी ११ वाजता दरम्यान शेतात जाऊन ज्वारी कापण्याकरिता गेलो होतो. व शेतातील काम आटोपून आम्ही सर्व सायंकाळी सहा वाजता च दरम्यान घरी आलो.
मुलगा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला
त्यानंतर माझा नातू कार्तिक मनाला की मी बैलाला पाणी पाजून येतो असा म्हणून तो शेतात गेला. परंतु बराच वेळ झाला तरी तो मी आला नाही म्हणून त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता तो उचलत नव्हता म्हणून मी व माझा मुलगा आम्ही शेतात जाऊन बघितले असता तो दिसला नाही म्हणून गावकरी व आम्ही मिळून सर्वत्र त्याचा शोध घेत असताना आमच्या शेतालगत शेत असलेल्या खुशाल यशवंत पडघने यांच्या शेतातील धुर्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत रात्री ११ वाजता च्या दरम्यान आढळून आला.
मृतकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करिता दाखल
या फिर्यादीवरून वरील प्रमाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल. ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच दि.२८ एप्रिलच्या रात्रीपासूनच पथक त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख मकसूद, पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे, बीट जमदार संदेश पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला तर घटनेच्या तपास बीट जमदार संदेश पवार करीत आहेत. मृतकाचा मृतदेह (dead body) ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम (Post mortem) करिता दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. सदरील अल्पवयीन मुलाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहेत ही आत्महत्या की हत्या ? अशी चर्चा परिसरात सुरू होती. अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाने आत्महत्या करावी हे अत्यंत दुःखदायक आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.