पुसद (Pusad Accident) : पुसद विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या काळी (दौ.) जवळील साई ईजारा कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाची दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या (Pusad Accident) भीषण अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना दि.२० जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. (Pusad Police) पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी( दौ.)पासून काही अंतरावर साई ईजारा सुरज विनोद चव्हाण (वय २२) रा, साई( ई.) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सुरज विनोद चव्हाण हा युवक आपल्या हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच २९ सी ऐ ३६३३ ने दुपारी चार वाजता दरम्यान काळी (दौ.) येथुन बाजार करुन साई ईजारा येथे जात असताना काळी( दौ.)ते साई ईजारा मार्गावर एका वळणावर सदर युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण च्या विद्युत खांबावर जाऊन आदळली, सदर अपघात भयंकर भीषण होता की, घटनेमध्ये सिमेंटचा विद्युत खांब तुटून पडला, व युवक जागीच ठार झाला, (Pusad Accident) अपघाताची माहिती काळी( दौ.) पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविले, सदर घटनेचा अधिक तपास (Pusad Police) ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार फुलउंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळी दौ. चौकीचे इन्चार्ज बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.