पुसद (Pusad Accident) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागपूर रोडवरील ज्योती नगर तांडा येथे दि. 18 ऑक्टोंबर च्या दुपार दरम्यान पुसद कडून पारधकडे जात असलेल्या दुचाकी हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एमएच -37यु 8389 ला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच 40 बीजी 3070 ने जोरदार धडक (Pusad Accident) दिल्यामुळे दुचाकी स्वार मृतक संदीप बाबुसिंग राठोड वय 35 वर्ष रा. पारध तालुका पुसद हा जागीच ठार झाला.
अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की, मृतक संदीप राठोड चा मेंदू रस्त्यावर पडलेला होता. (Pusad Accident) घटना घडताच ज्योती नगर येथील नागरिक घटनास्थळी धावले.बोलेरो पिकप वाहनाचा चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला. गटाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतक संदीप राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या संदर्भात बोलेरो पिकप वाहन चालक याच्या विरुद्ध गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होती.