सुदैवाने कार्यकारी अभियंत्या पुजारी मॅडम वाहनात नव्हत्या
पुसद (Pusad Accident) : पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Construction Department) कार्यकारी अभियंत्या कु. पुजारी मॅडम यांच्या वाहनाला यवतमाळच्या घाटात (Pusad Accident) पुढील वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे जबर धडक बसल्याची घटना घडली.
सहाय्यक लेखाधिकारी पांडे यांचा पाय फ्रॅक्चर
माहितीनुसार, पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Construction Department) कार्यकारी अभियंत्या कु. पुजारी मॅडम सध्या रजेवर आहेत. पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी पांडे व त्यांचे सोबती विनायक नांदुरकर चालक अबरार हे वाहन क्रमांक एम एच 29 एम. 9682 ने नागपूर येथे शासकीय कामाच्या मीटिंगसाठी गेले होते.
विनायक नांदुरकर यांच्या चेहऱ्याला किरकोळ जखम
परत येत असताना यवतमाळच्या घाटामध्ये ट्रकच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे सदरील वाहन जाऊन धडकले धडक इतकी जब्बर होती की, या (Pusad Accident) वाहनातील सहाय्यक लेखा अधिकारी पांडे यांचा प्राय फॅक्चर झाला. विनायक नांदुरकर हे पुढील सीटवर बसले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला सदरील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती दैनिक देशोन्नतीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके यांनी दिली.