पुसद (Pusad Accident) : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या धुंदी परिसरात मुख्य रस्त्यावर दि. 6 जुलै च्या दुपार दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक (Pusad Accident) लागून एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक एमएच29वाय 9201 बजाज डिस्कवर, तर दुसरी दुचाकी क्रमांक एमएच 29 व्ही 8510 होंडा स्प्लेंडर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण टक्कर लागून मोठा अपघात घडला.
या घटनेत दुचाकी चालक मृतक कानू मानिक होलघरे रा. बेलगव्हान वय 35 वर्ष, तर दुसरा गंभीर जखमी भाऊराव देवराव काळे वय 33 वर्ष रा. पाळोदी सदरील दोन्ही परिसरात भीषण अपघात (Pusad Accident) घडतात तातडीने नागरिकांनी गंभीर जखमीला येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचाराकरिता भरती केले. मात्र भाऊराव देवराव काळे यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना वर्धा येथील सेवाग्राम हॉस्पिटल येथे रेफर केल्याची माहिती मेडिकेअर हॉस्पिटल कडून दैनिक देशोन्नतीला देण्यात आली. तर याप्रकरणी (Pusad Police) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गंभीर घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार बंकेवार करीत आहेत.