पुसद (Pusad Accident) : पुसद तालुक्यातील आमदरी घाटात दि. १५ जुलै रोजी घाटामध्ये सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात व शाळेत ट्रक घुसल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची (Pusad Accident) विदारक घटना 15 जुलै रोजी घडली. माहितीनुसार, पुसद वरून नांदेड कडे जाणाऱ्या सिमेंट ट्रक एम एच १०/सी आर ७७११ क्रमांकाच्या ट्रकच्या ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने सदर ट्रक आमदरी गावातील रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला नंतर शाळेच्या शौचालयाला धडक दिल्याने शौचालयात घुसल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला.
सदरील अपघात 15 जुलै च्या सकाळी ११ते ११.३० च्या दरम्यान घडला आहे. या (Pusad Accident) अपघातामध्ये शाळेचा संडास आणि बाथरूम पूर्णतः पडला आहे. सायंकाळी मुलीचे आई वडील शेतातून घरी आले असता शाळेतून मुलगी का आली नाही? तेव्हा तपास केला असता शाळेच्या स्लॅब खाली मुलगी दबून पडलेली होती. यात तिचा मृत्यू झाला. कु. शितल पांडुरंग किरवळे (वय सात) असे मृतक मुलीचे नाव आहे. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. सदरील घटना (Pusad Police Station) ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अकार्यक्षम असल्यामुळे यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांची सुस्ती वाढलेली दिसत आहे. अशा अकार्यक्षम ठाणेदारांची हकालपट्टी करणे गरजेचे आहे हे विशेष.