पुसद (Pusad Assembly Constituency) : पुसद विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात असलेल्या काळी ( दौ.) परिसराच्या संपूर्ण विकासासाठी शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीला साथ द्या असे आव्हान ऍड. आशिष पंजाबराव देशमुख (Adv. Ashish Deshmukh) यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी येथे एका छोटेखानी सभेत नागरिकांना केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य, ज्येष्ठ नेते साहेबराव ठेंगे, शहराध्यक्ष साकिब शहा, नानासाहेब जळगावकर, दीपक जाधव, प्रा. सुरेश ठेंगे, परसराम डवरे, नारायणराव कऱ्हाळे, सिद्दिकी भाई, शब्बीर भाई इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या 72 वर्षांमध्ये विकासासाठी हा परिसर दुर्लक्षित राहिलेला आहे. काही परिसराला चाळीसच्या वर गावी जोडलेली आहेत मोठी बाजारपेठ आहे. त्यामानाने ग्रामीण भागात अजूनही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. (Pusad Assembly) मतदार संघाच्या आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केवळ या परिसराकडे दुर्लक्ष केले. निवडणुका आल्या की मतदानाचा जोगवा मागण्यासाठी ही लोकं मतदारांच्या दारात पोहोचतात. मात्र विकासासाठी प्रयत्न करीत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल.
या (Pusad Assembly) भागातील समस्यांच्या संदर्भात त्यांनी नागरिकांसमोर पाडाच वाचला. या भागाचा सक्षम आणि संपूर्ण विकास करायचा असेल तर व चेहरा मोहरा बदलण्यासाठी शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीला साथ द्यावी व हात बळकट करावे असे शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी अशोक आळणे, गौतम रणवीर, संतोष राठोड, सुखदेव बर्गे, बाबाराव पाटील, देविदास डाखोरे दीपक अवचार, काँग्रेसचे सय्यद इरफान, नरेंद्र जाधव, असलम डोसानी, अविनाश राठोड सरपंच यांच्यासह इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन नरेंद्र खंदारे यांनी केले तर प्रस्ताविक राऊत यांनी केले तर आभार संतोष भालेराव यांनी मानले.