पुसद (Pusad Assembly Election) : कधी नव्हे ती पुसद विधानसभेची निवडणूक सांगलीत रंगात येत असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या 4 ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज परत घेण्याची तारीख आहे. त्यानंतर खरे चित्र पुसद विधानसभेचे स्पष्ट होणार आहे. मात्र या अगोदरच कधी नव्हे तेव्हा (Pusad Assembly Election) पुसद विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगताना दिसत आहे. विद्यमान आमदारांना नाईक बंगल्यातूनच त्यांचे जेष्ठ बंधू यांचा विरोध होताना दिसत आहे तर त्यांनी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून नामांकनही दाखल केलेले आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, माजी नगराध्यक्षा सौ. अनिता नाईक हे दोन्ही पिता माता आपल्या दोन्ही पुत्रातील राजकीय वाद शमऊ शकले नाही.
ज्येष्ठ पुत्र याच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या सौभाग्यवतीसह त्यांच्या कार्यकर्ते मंडळात निर्माण झालेली आहे. खरे पाहता माजी मंत्री मनोहर नाईक व माजी नगराध्यक्षा अनिता नाईक त्यांनी प्रथम आपल्या ज्येष्ठ पुत्राला न्याय द्यायला हवा होता. तर विधानसभेची पहिली (Pusad Assembly Election) निवडणूक आपल्या कनिष्ठ चिरंजीवा ऐवजी आपल्या ज्येष्ठ पुत्राला संधी देणे गरजेचे होते. व ते न्याय संगतही होते. कारण त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अत्यंत कुशल कारभार केलेला होता. राजकीय जीवनामध्ये ते विद्यमान आमदारांपेक्षा अगोदर सक्रिय झालेले होते.
मात्र आई-वडिलांकडूनच राजकीय दृष्ट्या डावलेल्या गेल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या सौभाग्यवतीने झालेली आहे. हीच भावना पुसद विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवणार आहे. महाविकास आघाडीचे विद्यमान अधिकृत उमेदवार एड शरद आप्पाराव मैंद यांना वाढता पाठिंबा हे त्याचे धोतक आहेत तर पुसदच्या बंगल्यामध्ये पहिल्यांदाच शमशान शांतता निर्माण झालेली दिसत आहे. या (Pusad Assembly Election) निवडणुकीचे वैशिष्ट्य तर महायुती व महाविकास आघाडीतील अतिशय होणारा चुरशीचा सामना आणि माता-पितांनी ज्येष्ठ पुत्रांचा केलेला अपमान याचा मतदान रुपी बदला घेण्यासाठी समाजही मनातून तयार झालेला दिसत आहे. हे विशेष