विश्वास लांडगे जिल्हाध्यक्ष यांचे वक्तव्य
पुसद (Pusad Assembly Election) : आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी राष्ट्रीय नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात मार्गक्रमण करीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महत्त्व राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास लांडगे यांनी व्यक्त केली आहे. पुसद मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदासह मंत्रीपदी मिळालेली आहेत. तर तीन-तीन आमदार सुद्धा अलीकडच्या काळात मतदार संघाला मिळाले होते.
मात्र एवढं असूनही मतदार संघातील शेतकरी हा पूर्णतः विकासापासून वंचितच राहिला आहे. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने झटणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करून प्रसंगी निवेदन देऊन न्याय मिळावा याकरिता झटत आलेली आहे. होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीमध्ये मतदारसंघांमध्ये मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महत्त्व राहणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी जो प्रयत्न करेल त्याच्या पाठीशी शेतकरी संघटना उभी राहील असे शेवटी त्यांनी सांगितले.




