पुसद (Pusad Assembly Election) : पुसद विधानसभा मतदार संघ अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण स्व. बाबासाहेब नाईक अभियंत्रिकी कॉलेज येथे देण्यात आले . निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर. दिग्रस चे तहसीलदार मयूर राऊत, नायब तहसीलदार गणेश कदम ,झारखंड राज्या चे, निवडणूक निरीक्षक, सत्येन्द्र कुमार, यवतमाळ येथील पर्यवेक्षक तथा निवडणूक निरीक्षक शिरीष नाईक, बी डि ओ ज्ञानेश्वर ठाकरे, दिलीप कोलेवाड, देवानंद राठोड, कामराज चौधरी, नागेश जोगदे, आशिष वानखेडे,सुधीर भुस्कुटे, अभिजित बोरकर, मंगेश टिकार, प्रशांत मुक्कावर यांनी प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पार पाडणे करिता कामे केली.
तसेच आपली कामे चांगल्या प्रकारची असावी, तुमची कामे तुम्हालाच करावी लागणार आहे. याबाबत (Pusad Assembly Election) निवडणूक निर्णय अधिकारी पुसद यांनी सूचना दिल्या तसेच निवणूक आयोगाच्या निर्देश पुस्तिका वारंवार वाचली पाहिजे निवडणूक आयोगाने सांगितलेली अशी कोणती गोष्ट त्यामध्ये नाही त्या पुस्तकांमध्ये नियम व अटी पुस्तकांमध्ये मिळतील. आपल्या मतदानात मतदानाच्या अगोदरच्या दिवसापासून 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या सायंकाळपर्यंत अशा सर्व गोष्टी या पुस्तकात लिहिलेल्या आहे, शंका असल्यास पुढील प्रशिक्षणत दूर करता येईल या त्यासाठी आपण पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
पुस्तकांमध्ये कामराज चौधरी यांनी (Pusad Assembly Election) निवडणूक कामकाजासंबंधी तसेच मतदान यंत्रे हाताळण्याबाबत प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बीजवल यांनी काम कामकाजा संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला अधिकारी कर्मचारी दि.11 नोव्हेंबर रोजी ८७४ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले व १२ नोव्हेंबर रोजी ७३२ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्याचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पार पडले आहे. यावेळी आयोजकांनी प्रशिक्षण स्थळी अत्यंत सुंदर व्यवस्था केल्याच्या प्रतिक्रिया बाहेर गावाहून मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर आलेल्या महिला व पुरुष मंडळींनी व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.