पुसद (Pusad Assembly Elections) : आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ती यावेळेस होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड उत्साहात्मक व स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांनी पुन्हा महायुतीकडून उमेदवारी मिळवत एबी फॉर्म प्राप्त केला आहे.
महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखविला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे चांगल्या मताधिक्यने विजयी झाले होते. राज्यातही महाविकास आघाडीने चांगला परफॉर्मन्स ठेवला होता. यामुळेच (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी कडून (Pusad Assembly Elections) पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळावी याकरिता 9इच्छुकांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुसद अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, राष्ट्रवादी शरद पवार गटाची लीगल सेलचे अध्यक्ष ऍड आशिष देशमुख, युवा नेते ययाती नाईक, मध्यवर्ती कपडे बँकेचे पुसद विभागाचे संचालक अनुकूल चव्हाण, शिवाजीराव राठोड, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी, माधवराव वैद्य तर इत्यादींनी सिल्वर ओक वर जाऊन मुलाखती दिल्यात.
मात्र 27 तारीख पडत आहे तरीही (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचा उमेदवार (Pusad Assembly Elections) पुसद विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. यामुळे मात्र महाविकास आघाडीचा पुसद विधानसभेचा उमेदवार कोण? असा संभ्रम निर्माण झालेला आहे. अगोदरच उमेदवारांना प्रचाराकरिता कमी अवधी मिळणार आहे. येत्या 28 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त कळत आहे हे विशेष.