पुसद विधानसभा मतदार संघ -81 निवडणूक उत्सव
पुसद (Pusad Assembly Elections) : आगामी होऊ घातलेल्या पुसद विधानसभा निवडणुकी करिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात 35 झोनल अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तर येत्या 27 तारखेला तर हे 35 झोनल अधिकारी पुसद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नेमण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देतील.
या बैठकीला झोनल अधिकारी कु. प्रिया पुजारी,प्रकाश झळके, कोल्हे, वाय पी जाधव, यश मंदाडे, पिके राठोड, ए डी जाधव, सुनील भालेराव, अभिजीत वायकोस, सौरभ सोनी, अनिल नावक, संजय काकडे, सतीश नांदगावकर, डॉ. भूषण मेश्राम, कल्पेश चौरे, सीमा ए तायडे, अविनाश भगत यांच्यासह पुसद विधानसभा आचारसंहिता निवडणूक नियंत्रक निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, निवडणूक विभागाचे वरिष्ठ लिपिक देवानंद राठोड सत्यम राठोड इत्यादी उपस्थित होते.