पुसद (Pusad Assembly) : उपविभागीय कार्यालयातील सभागृहात दि. 6 ऑगस्ट रोजी बीएलओ व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Pusad Assembly) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै रोजी अहर्ता दिनांक वर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम पुन्हा सुधारित केला आहे.
या दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि.6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 10( शनिवार),11( रविवार) ऑगस्ट तर 17 व 18 ऑगस्ट या चार दिवशी पुसद विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अशी (Pusad Assembly) माहिती उपस्थित राजकीय पक्षांना तथा बीएलओंना सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल नायब तहसीलदार गजानन कदम, निवडणूक विभागाचे देवानंद राठोड ऑपरेटर सत्यम यांनी दिली. यावेळी राजकीय पक्षाचे विजय बाबर, बुद्ध रत्न भालेराव, शेख जिया, इरफान भाई, लक्ष्मण कांबळे, हरीश गुरुवाणी, संतोष मुकेश, सय्यद शिरजुद्दीन, दयानंद उबाळे, अरुण राऊत, रुपेश जाधव, शंकर माहुरे, दिनेश खांडेकर, फिरोज खान, शेख फिरोज, अंबादास वानखेडे व प्रेम राव सरगर इत्यादी उपस्थित होते.