अद्यापही समाजबांधवांसह नेत्यांचे उपोषण मंडपाकडे दुर्लक्ष!
पुसद (Pusad Banjara Samaj) : हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुसद येथील पूर्णकृती पुतळ्यालगत (Banjara Samaj) बंजारा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेले अखिल भारतीय तांडा सुधार समिती व अखिल भारतीय बंजारा युवा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जिणकर राठोड गेल्या अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी उपोषणे आंदोलने पायदळ यात्रा काढूनही बंजारा व विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समस्या सुटत नसल्यामुळे पुन्हा त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दि. 27 जून रोजी त्यांच्या या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस दुर्दैवाने कोणत्याही नेत्याने (Banjara Samaj) समाज बांधवांनी याची अजूनही दखल घेतली नाही. तर गोर सेनेने व इत्यादी संघटनांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. पाचव्या दिवशी प्रभारी तहसीलदार इंगोले यांनी उपोषण स्थळी भेट दिली. व उपोषणकर्त्यांना आश्वस्त केले की, वरिष्ठांना त्यांच्या मागण्या पाठविले आहेत. त्यांनी प्रशासनाच्या वतीने जिनकर राठोड यांना उपोषण स्थगित करण्याचे आव्हान केले. त्यावर उपोषण कर्ते जिनकर राठोड यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना म्हणाले की, आमचे दुर्दैव आहे.
समाजाच्या मागण्यासाठी संघर्ष करणाऱ्या (Banjara Samaj) व्यक्तींकडे आमरण उपोषणाकडे येथील राजकीय नेते आमदार तथा पालकमंत्री सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. मात्र माझा ठाम निर्धार आहे. जोपर्यंत वरील प्रमाणे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझ्या आमरण उपोषणावर ठाम राहणार आहे. याप्रसंगी गोर सेनेचे जय राठोड, अर्जुन राठोड, विकास राठोड, विजय जाधव, विटाळा येथील विजय राठोड इत्यादी उपस्थित होते.