पुसद (Pusad Bank) : प्रचलित चलनातील नाणे नाकारणे म्हणजे ‘आरबीआय’च्या (RBI) नियमाने हा गंभीर गुन्हाच आहे. परंतु, तरीदेखील सध्याच्या परिस्थितीत शहरी भागासह ग्रामीण भागातील गावेखेडयांमध्ये दहा रुपयांची नाणे (ten rupee coin) घेण्यास ग्राहकांकडून नकार दिला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. म्हणून, याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Pusad Bank) सुरुवातीला पाच किंवा दहा रुपयांची नाने बाजारात प्रथम बहुतांशजणांचे आकर्षण ठरले होते.
अनेक नागरिकांनी दहा रुपयांचे नाणे संग्रहित पण ठेवले होते. परंतु बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू पसरलेल्या अफवांमुळे दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा झाल्या होत्या त्याचाच परिणाम म्हणून सध्या स्थितीत दहा रुपयांची नाणी (ten rupee coin) म्हटलं की, सहसा कुठलाही दुकानदार व ग्राहक घेण्यास तयार दिसत नाही. या दोघांसाठीही डोकेदुखी होऊ लागली आहे. एकूणच दहा रुपयांच्या नाण्याबाबत शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदरील नाणे हे चलनात असून सर्व नागरिकांनी व्यवसायिकांनी या संदर्भात घेणे देणे कायम ठेवणे गरजेचे आहे व प्रशासनाने (Pusad Bank) बँकांनी या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे हे विशेष.