पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवास धोरणात्मक निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाची मनाई
पुसद (Pusad Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समिती च्या 18 पैकी 9 संचालकांनी दिलेले राजीनामे स्वीकारणे ऐवजी 2 स्वीकृत सदस्य घेण्यात आले. या विरुद्ध राजीनामा दिलेल्या दिनेश राठोड या संचालकाने एड. अमोल पाटील नागपूर यांच्यामार्फत उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर अभय जे. मंत्री व भारती डोंगरे यांच्या दोन सदस्य खंडपीठाने अंतरिम आदेश काढून सचिव व सभापती यांना कोणतीही बैठक घेताना समितीच्या कामकाजावर परिणाम करणारा कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापासून प्रतिबंधित केले.
तसेच याचिका कर्त्यांनी दिलेले राजीनाम्याची पत्रे स्वीकारण्यास मोकळे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाने (Pusad Bazar Samiti) पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालणाऱ्या मनमानी कारभाराला चपराक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हे विशेष.