पुसद शहरात गुन्हेगारांचे थैमान
पुसद (Pusad Bus station) : शहर पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या पुसद बस स्थानकामध्ये (Pusad Bus station) भावाच्या भेटीसाठी आलेल्या बहिणीचे तब्बल दोन लाख ४७ हजारांचे सोन्याचे दागिने एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि. 25मे च्या दुपारी १:४० वाजताच्या दरम्यान पुसद बसस्थानकात घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pusad Police) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीबाई देविदास खरात (४३, रा. गणपतीनगर, शेगाव, जि. बुलढाणा) या २२ मे रोजी पतीसह पुसद येथे त्यांचे भाऊ मारोती सरगर (रा. देशमुखनगर) यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. शनिवारी दुपारी त्या शेगावी परत जाण्यासाठी पुसद बस स्थानकावर गेल्या असता ( Bus station) बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स लंपास केली.
या प्रकरणी पुसदमध्ये खळबळ
या पर्समध्ये ३० ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत (एक लाख ४० हजार), १६ ग्रॅम सोन्याचा गोफ (किंमत ७५ हजार), सात ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत ३० हजार) व रोख २ हजार, असा एकूण दोन लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मीबाई देविदास खरात यांच्या तक्रारीवरून (Pusad Police) पुसद शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवी कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केला. अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक करीत आहे. सध्या उन्हाळी सुट्या व लग्नसराई असल्याने पुसद बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Pusad Police) पोलीस प्रशासनाने पुसद बस स्थानकामध्ये कायमस्वरूपी मोठा बंदोबस्त तैनात करणे गरजेचे आहे. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे प्रवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.