पुसद (pusad City council) : अखेर दैनिक देशोन्नतीच्या दणक्याने वाहतुकीस अत्यंत अडचणीचा ठरत असलेला, व गेल्या अनेक दिवसांपासून रखडत ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक यादरम्यान चा रस्ता दैनिक देशोन्नतीने वारंवार वृत्त प्रकाशित करून कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून संबंधित प्रशासन व नोंदणीकृत ठेकेदाराचे लक्ष वेधले होते. जनसामान्यांना असाह्य होणारा त्रास दैनिक देशोन्नतीने मांडला होता. त्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाईक हॉस्पिटल दरम्यान रस्त्याचे काम सुरू झाले आहे मात्र गुणवत्ता राखल्या जात नाही हे विशेष.