मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस याकडे गांभीर्याने लक्ष देणार का?
पुसद (Pusad banners) : घाटकोपर येथील अनाधिकृत बॅनर (Pusad banners) कोसळून त्याखाली अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. याची राज्य शासनाने गंभीर दखल घेत सर्व जिल्हाधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जिल्हा परिषदेचे सीईओ जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्यासह सर्व ठाणेदारांना निर्देश दिले होते की, प्रत्येक शहरातील अनधिकृत फलक बॅनर होर्डिंग्स युद्ध पातळीवर कारवाई करून काढण्यात यावेत. याची दखल पुसद नगरपालिकेच्या प्रशासनाने सुद्धा घेतली होती.
एक दिवस कारवाई करून काही (Pusad banners) बॅनर्स फलक होर्डिंग नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुसद शहराचे सौंदर्य खराब करण्याचे काम येथील काही राजकारण्यांसह इतरांनी स्वतःच्या वाढदिवसाचे व शहरातील इतर काही व्यवसायिक दुकानदारांनी विनापरवान की बॅनर्स फलक शहरात लावले आहेत या संदर्भात पुसद नगरपालिकेचे कर विभाग ब चे विभाग प्रमुख कुरमे यांना विचारणा केली असता त्यांनी यापैकी काही लोकांनीच विशेष करून इराणी ब्रदर्स, राजधानी कापड दुकान अशा काही लोकांनीच परवानगी घेऊन, किती बॅनर्स लावले त्याचे पैसे नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे भरले होते.
मात्र शहरात असंख्य बॅनर्सची (Pusad banners) संख्या वाढली असून हे सर्व बॅनर्स विनापरवानगी लागलेले आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य तर खराब झालेच शिवाय नगरपालिकेचे आर्थिक नुकसानही झाले. या सर्वांना सक्त ताकीद देऊन नगरपालिकेकडून पैसे भरून घेतले असते तर नगरपालिकेला महसूल प्राप्त झाला असता. त्यांना शहरात विकास कामे करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली असती. मात्र तसे झाले नाही व नागरिकांनीही व राजकारण्यांनी ही आपल्या कर्तव्यापासून पळ काढू नये. “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ” ची अवस्था पुसद ची झालेली आहे हे विशेष.