पुसद (Pusad):- दबा धरून बसलेला मान्सूनचा (monsoon) पाऊस दि. 23 जून रोजी सायंकाळ दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागात धोधो बरसला.
मात्र जांब महसूल मंडळातील गावात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला विशेष करून जांब बाजार, शेलु खुर्द, भोजला, कोपोरा, येरंडा, पारडी, गाजीपुर,वालतुररेल्वे परीसरात मेघगर्जनेसह धुवाधार पाऊस (rain) कोसळला सर्वत्र शेतात पाणीच पाणी झालेले चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांवर(farmers) दुबार पेरणीचे संकट घोंगावत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे.