स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पुसद शाखेची कारवाई
पुसद (Pusad Crime) : आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन वसंतनगर मधील पार्वती नगर येथील शेख सददाम शेख पाशा हा त्याच्या स्वतःचे ताब्यात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा (Pusad Crime) करण्याचे इरादयाने लॉखडी धारधार तलवार बाळगून आहे. अशी खात्रीशिर माहीती गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळाली. पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्याच्या जवळ एक टोकदार धारदार स्टीलची लोखंडी धातूची तलवार अंदाजे किंमत 2000 रुची मिळून आली ती जप्त करुन ताब्यात घेवून शेख सददाम शेख पाशा वय 23 वर्षे, रा.पार्वतीनगर याच्या विरुध्द वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर,पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा/ सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे (Pusad Crime) शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.