पुसद मध्ये एकाबारमध्ये 2 इसमांवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
पुसद (Pusad Crime) : शहरातील कारला रोडवरील दुचाकीच्या शोरूम जवळ असलेल्या रामकृष्ण बार मध्ये 2 तरुणांवर 2 व्यक्तींनी मिळून गुप्तीने प्राणघातक हल्ला (Pusad Crime) केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान घडली. प्रथम दोघांनाही येथील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. तर एका युवकाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला (Yavatmal Hospital) यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले .
प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारला रोड वरील हिरो शोरूम जवळ असलेल्या रामकृष्ण बार मध्ये सायंकाळी साडेआठ वाजता च्या दरम्यान वाजताच्या निखिल कर्तारसिंग राठोड वय 36 वर्ष व किरण उर्फ रुपेश वाघमारे वय 28 वर्ष दोघेही रा. गुणवंतराव देशमुख महाविद्यालय जवळ हे बार मध्ये बसले असता.संभाजी नगर पुसद येथील अंदाजे 23 वर्षीय राजा नामक इसम व एक अज्ञात व्यक्ती असे दोघे तिथे आले. या चौघाचा एकमेकांशी बोलण्याबोलण्यातून वाद निर्माण झाला. अशातच राजा नामक व्यक्तीने त्याच्या जवळील धारदार गुप्तीने निखिल कर्तारसिंग राठोड याच्यावर हल्ला चढवीला. यामध्ये निखिलच्या डाव्या बाजूच्या बरगडी जवळ गंभीर वार करण्यात आले. निखिल राठोडला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या रुपेश उर्फ किरण वाघमारे याच्यावर सुद्धा त्या धारदार गुप्तीने डाव्या हातावर सपासप वार केले.
यामध्ये निखिल आणि रुपेश उर्फ किरन दोघेही गंभीर जखमी (Pusad Crime) झाले. मारणारे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निखिल आणि रुपेश यांना तात्काळ लाईफ लाईन येथे प्राथमिक उपचाराकरिता आणण्यात आले. मात्र अति गंभीर असलेल्या निखिल राठोडच्या पोटाला खोल वर जखमा असल्यामुळे त्यास ICU मध्ये भरती करण्यात आले. मात्र त्याची तब्येत गंभीर झाल्यामुळे त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात (Yavatmal Hospital) रेफर करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात दि. 11 जुलै च्या तीन वाजेपर्यंत ही कोणीही फिर्याद देण्यास पुढे आलेले नव्हते या संदर्भात तर (Pusad Police) पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या सूचनेनुसार बीट जमदार राहुल भगत व इत्यादी परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.