पुसद (Pusad Crime) : वसंतनगर पोलीस स्टेशन (police station) अंतर्गत येत असलेल्या वाशिम रस्त्यावरील श्री शिवाजी शाळेसमोर उभी असलेल्या फिर्यादीला जबरदस्तीने स्वतःच्या गाडीवर बसवून वाशिम रोड वरील प्रभा पेट्रोल पंप लगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर फिर्यादीचे डोके आपटून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण (Pusad Crime) केल्याची घटना दुपार दरम्यान घडली.
पोलीस पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना
पोलीस (Pusad Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर संजय आडे वय 22 वर्ष रा. मांडवा याने आपल्या दुचाकी वर येऊन श्री शिवाजी शाळेसमोर उभे असलेल्या फिर्यादीला तू माझ्यासोबत का बोलत नाही, असे म्हटल्यावर फिर्यादी स्कुटीवर बसून त्या ठिकाणावरून निघून जात असताना आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून तिला अडवून जबरदस्तीने गाडीवर बसून आयुर्वेदिक शाळेजवळ असलेल्या प्रभा पेट्रोल पंपाजवळ नेले व त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर फिर्यादीचे डोके आपटून (Pusad Crime) जबर मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ दिल्या. फिर्यादीने घाबरलेल्या अवस्थेत वसंतनगर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली. (police station) वसंतनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी किशोर संजय आडे याच्या विरुद्ध विविध कलमान्वये व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदर घटनेचा तपास सहाय्यक (Pusad Police) जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर हे करीत आहेत.