पुसद (Pusad Crime) : पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरातील गुजर चौक परिसरात सायंकाळी पाच वाजता दरम्यान (Pusad Crime) एक इसम धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत शहर डीबी पथकाला मिळाली. (Pusad police) पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे सपोनी निलेश देशमुख डीबी पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून सापळा कार्यवाही केली. सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान गुजरीचौक येथे एक ईसम रित्या उभा दिसला पोलीस आल्याचे पाहताच त्या ठिकाणावरून पळुन जावु लागला पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवन त्यांचे नाव गाव विचारले. त्याने त्याचे नाव पप्पु उर्फ ताबिश रजा शेख मुस्तकिम वय २९ वर्ष रा. गढीवार्ड पुसद असे असल्याचे त्याने सांगितले त्याची अंगझडती घेतली. त्याचे जवळ एक लोखंडी धारदार तलवार अवैधरीत्या बाळगतांना मिळून आली. तलवार जप्त करून त्याला ताब्यात घेतले. शहर (Pusad police) पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुध्दोधन भगत यांनी दिले फिर्यादी वरून कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा करण्यात आला.
पुसदच्या गुजरी चौकात तलवार घेऊन फिरणारा इसम जेरबंद
सदर कार्यवाही (Pusad police) पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहायक पोलीस अधिक्षक तथा उप. विभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शानाखाली व पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर यांचे सुचना प्रमाणे डि. बी प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक निलेश देशमुख, पो.ह. प्रफुल इंगोले, पो.ह. वा मनोज कदम, पो.कॉ शुध्दोधन भगत, पो.कॉ आकाश बाभुळकर यांनी केली.