पुसद (Pusad Crime) : छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बसस्थानकाकडे जात असलेल्या एका चार चाकी वाहनाने राजकुमार टॉकीज लगत असलेल्या आर के लॉज जवळ उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 27बी व्ही 5680 या वाहनाला व त्या ठिकाणी असलेल्या इंडिगो गाडी क्रमांक एम एच 29 एके 12 23 च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपने भरधाव वेगाने चालवून जबर ठोस मारली यामध्ये गाडीचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी ढालुमल छबलानी रा. अमरावती व्यापारी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेले फिर्यादीनुसार अपराध क्रमांक 584/2024 कलम 281,324(4),(5),bns अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायंकाळी 8.54 वाजताच्या दरम्यान सदरील अपघात घडला. सदरील वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करावी. तर याच वाहनाने लगत असलेल्या अनिल चाट सेंटरच्या गाडीलाही ठोस मारली यामध्येही त्यात अनिल चाट सेंटर गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले . ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अतुल दातीर करीत आहे.