यवतमाळ, वाशिम, हिंगोली जिल्ह्यातून तडीपार
पुसद (Pusad Crime) : पुसद ग्रामिण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या गावठी दारू विकणारा धोकादायक ईसम रमेश माधवराव बावणे वय ४५ वर्ष, रा. हुडी (बु.) याचेवर पोलिस स्टेशन पुसद ग्रामिण (Pusad Crime) येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद असल्याने, वेळोवेळी त्याचेवर कारवाई करून सुध्दा त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याचा गुन्हेगारीचा अभिलेख लक्षात घेउन त्याचे वृत्तीत सुधारणा घडून येण्याच्या दृष्टीने (Pusad Police) पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सदर ईसमाचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधिक्षक यवतमाळ यांचे मार्फत उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांचेकडे सादर केला होता.
उपरोक्त नमुद हद्दपार ईसम रमेश माधवराव बावणे रा. हुडी (बु.) याच्या हद्दपारीच्या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांनी मान्यता देवून त्यास एक वर्षाकरीता यवतमाळ, वाशिम, हिंगोली जिल्हयातून हद्दपारी चा आदेश पारीत केला. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक कुमार चिता, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थागुशा, यवतमाळ, पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेंद्र राउत, पोलिस हवालदार रविंद्र गावंडे, पोलिस हवालदार इंदल आडे, संदिप आडे (Pusad Police) पोलिस स्टेशन पुसद ग्रामिण यांनी पार पाडली आहे.