पुसद (Pusad Crime) : शहर पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या पाण्याच्या टाकी परिसरातील एका ठिकाणावरून उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्की मधून तीस हजार रुपयाची रक्कम हेल्मेट घालून दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून (Pusad Crime) नेल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, दि. 21 जून रोजी चार वाजता च्या दरम्यान नांदे नामक शिक्षक हे आपल्या दुचाकी वर परिसरात आले असता त्यांच्या डिक्की मध्ये त्यांनी ठेवलेले तीस हजार रुपयाची रक्कम जे त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी त्यांची नजर चुकताच ती लांबविली.
सदर प्रकरणी शहर पोलीस (Pusad Police) ठाण्यात संबंधितांनी फिर्याद देण्याची प्रक्रिया केली गुन्हा दाखल करण्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू होती. विशेष करून पुसद मध्ये कालच एका दुचाकीचा डिक्की मधून 66 हजाराची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लाविण्याची घटना घडली होती. याप्रकरणी (Pusad Police) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याची शाई वळतो न वळताच पुन्हा त्याच प्रकारचा (Pusad Crime) गुन्हा शहरात घडल्यामुळे. पुसद करांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पुसद शहर तालुक्या मध्ये गुन्हेगारांचे वाढते धाडस हे कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे आहेत. चोरटी रेती, मुरूम वाहतूक अवैद्य दारू व्यवसाय, मटका जुगार गावठी दारू याचा सध्या पुसद तालुक्यामध्ये शहरासह सर्वत्र महापूर वाहत आहे. (Pusad Crime) गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. गुन्हेगारांचे धाडस वाढलेले आहेत. पोलीस प्रशासनाने अतिशय कडक कारवाई करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचे व्यवसायिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. याकरिता (Pusad Police) पोलिसांनीच आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.