पुसद (Pusad Crime) : वसंतनगर पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या, पुसद वाशिम रस्त्यावर असलेल्या आदर्श नगर येथे ग्रामपंचायतिच्या विहिरीच्या काही अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये गोवंशाचे मुंडके कोणीतरी अज्ञात इसमाने आणून टाकले असल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pusad Crime) पुसद शहरातील शांतता भंग होऊन धार्मिक सलोखा अबाधित राहू नये या उद्देशाने हे कृत्य केले असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेने आरोप केले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या
माहितीनुसार, बकरी ईद होती. सकाळी मुस्लिम बांधवांनी येथील मोहम्मदीया मस्जिद मध्ये नमाज अदा करून दिल्या होत्या. मात्र सायंकाळ दरम्यान साडेचार ते साडेपाच वाजताच्या दरम्यान आदर्शनगर येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गोवंशाचे मुंडके असल्याचे दिसून आले. त्यानंतर या (Pusad Crime) घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. रात्री 9 वाजताच्या दरम्यान या घटनेची माहिती (Pusad Police) वसंतनगर पोलीस पोलिसांना मिळाली. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील गोवंशाचे मुंडके पंचनामा करून येथील पशुवैद्यकीय दवाखाना नाईक चौक येथे मेडिकल सॅम्पल घेण्याकरिता आणले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना येथे ठिय्या मांडला होता. अखेर रात्री 12 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास डॉक्टरांमार्फत त्या गोवंशाच्या मुंडक्याचे सॅम्पल घेऊन सिल पॅक करून (Pusad Police) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस प्रशासनामार्फत शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये जनजागृती करून सुद्धा अशा प्रकारची घटना उघडकीस येणे म्हणजे कुणीतरी जाणून बुजून पुसद शहराचा धार्मिक सलोखा नष्ट करण्याच्या मानसिकतेतून आणि शांतता भंग होण्याचा उद्देशातून ही (Pusad Crime) घटना घडवून आणली असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेने आरोप केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते गोवंशाचे मुंडके विहिरीच्या काही अंतरावरच आणून टाकले होते. आता हे नेमके का केले असावे याचा शोध वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संपूर्ण देशात गोहत्या बंदी कायदयाचे कडक प्रावधान असून सुद्धा व हिंदुत्ववादी संघटनेमार्फत वारंवार निवेदन देऊन सुद्धा बकरी ईदच्या दिवशी अशा प्रकारची घटना उघडकीस येणे किती गंभीर बाब म्हणावी?
या घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून त्यावर पशु संरक्षण अधिनियम अन्वये गंभीर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेमार्फत करण्यात येत आहे. तर पुसद चे वातावरण कोणीतरी अज्ञात माथेफिरू खराब करण्याच्या दृष्टीने कृत्य केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. शहर अति संवेदनशील म्हणून शासन दप्तरी नोंदल्या गेलेले आहे. बकरी ईद निमित्त गोरक्षकावर हल्ले, संभाजीनगर लोहार लाईन या परिसरासह शहरात चार-पाच घटना घडल्याचे समजते. (Pusad Crime) सर्व प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे पाऊले उचलल्या जात आहेत. याप्रकरणी (Pusad Police) वसंतनगर पोलीस ठाण्यात अरविंद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की , अफवांना बळी पडू नका शांतता कायम ठेवा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सहकार्य करा.