पुसद (Pusad Crime) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या व शिवाजी वॉर्ड मधील (Jadhav grocery shop) जाधव किराणा बाजार या दुकानात दि. 27 जुलै च्या मध्यरात्री दरम्यान चोरट्याने मागील बाजूने प्रवेश करून दुकानात असलेल्या तीन हजार रुपयांच्या ड्रायफूटवर डल्ला मारला तर दुकानातील गल्ल्यात असलेली 10 हजाराची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. दुकानाचे मालक विनोद रंगराव जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दि. 28 जुलै रोजी फिर्याद दाखल केली.
विशेष म्हणजे अज्ञात चोरट्याने काजू बदाम किसमिस यावर जास्त लक्ष केंद्रित करून ते चोरले. (Jadhav grocery shop) जाधव किराणा दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे सदर अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये कैद झालेला दिसून येत आहे. याप्रकरणी (Pusad City Police) शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार उमेश बेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमदार पवार व शहर पोलीस करीत आहेत.