फिल्मी स्टाईलच्या घटनेने पुसद हादरले!
पुसद (Pusad Crime) : शहर पोलीस स्टेशन येथे दि. 12 जुलै रोजी गजानन कैलास गायकवाड वय 27वर्ष रा. अमृतनगर खंडाळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना मोबाईलचा हप्ता भरण्याकरिता पैशाची आवश्यकता (Pusad Crime) असल्याने त्यांनी त्यांच्या गावातील ओळखीचा आर्यन रविकांत शिंगनकर याला चार हजार रुपये मागितले होते. त्यांनी त्यांना सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत. मात्र तुला पैशाची गरज आहे तर मी माझ्या ओळखीच्या व्यक्ती अक्षय गोले रा. मुंगसाजी नगर यांच्याकडून उसने घेऊन देतो. अक्षय गोले वय 21 रा. कुऱ्हा ता. आर्णी हल्ली मुक्काम रमेश माने तेरा बार लेआउट यांच्या घरी. यांनी चार हजार रुपये उसने दिले होते.
मात्र फिर्यादीस पैसे परत करण्यास उशीर झाला. असे म्हणून तू मला जास्त पैसे मागू लागला होता. त्यानंतर दि. 11 जुलै रोजी फिर्यादी हे त्यांच्या घरी अमृत नगर खंडाळा येथे असताना चार वाजता च्या दरम्यान आरोपी सुदर्शन उर्फ सोन्या बबनराव देशमुख वय 25 रा. वरुड हल्ली मुक्काम बहिणाबाई नगर पुसद व अधिक तीन फिर्यादीस खंडाळा येथील कॅन्टीन वर चहा घेऊ म्हणून मोटर सायकल वर बसवून पुसद येथील भिम वाडी येथे असलेल्या एका मैदानात आणले. (Pusad Crime) यावेळी आरोपी सुदर्शन देशमुख फिर्यादीस म्हणाला की, तू कसे काय पैसे देत नाही तुला बघतोच असे म्हणत कमरेचा बेल्ट काढून 40 ते 50 बेल्टचे वार पाठीवर मारले. आरोपी अक्षय गोले याने काठीने पाठीवर मारले. तर चौथा आरोपी ज्याचे नाव निष्पन्न झाले नाही त्याने टॉमिने हातात दगड घेऊन तोंडावर मारले यामुळे फिर्यादीस मोठी दुखापत झाली.
फिर्यादी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला असता. या चारही आरोपींनी त्याला जबरदस्तीने मोटर सायकल वर बसवून अपहरण वरुड कडे घेऊन गेले व तेथेही त्यांना मारहाण केली. त्यानंतर दि. 12 जुलै रोजी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात असलेल्या एका शेतातील टिनाच्या शेडमध्ये डांबून ठेवले व कडी लावून घेतली व सर्व आरोपींनी मद्यप्राशन केल्यामुळे आरोपी नशेत झोपली असल्यामुळे फिर्यादीने कशीबशी आपली त्या (Pusad Crime) ठिकाणावरून सुटका करून घेतली. थेट आपले घर गाठले दुसऱ्या दिवशी (Pusad Police) शहर पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पोलीस उपनिरीक्षक नगीना शेख यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर चौथा आरोपी अजूनही फरारच आहे. आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाचा पीसीआर मिळाला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 515/2024 118(2),127(8),308(4),140(4),351(3)(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल (Pusad Crime) करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास (Pusad Police) जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नगीना शेख या करीत आहेत.